Arnab Goswami and Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यानंतर आता सोमय्या अडकणार?

उद्योजक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यानंतर आता सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह इतर नेत्यांना लक्ष्य केले आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा पेटला आहे. उद्योजक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यानंतर आता सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. नाईक प्रकरणी राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सोमय्यांची भेट घेतली होती, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, कोर्लईतील त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक होते. नाईक यांना आत्महत्या का करावी लागली, यावर भाजपचे लोक बोलत नाहीत. नाईक यांना ज्यांच्यामुळे आत्महत्या लागली त्याच्या समर्थनार्थ भाजपचे लोक बोलत होते. नाईक यांना सोमय्यांनी धमकी होती, याची माहिती माझ्याकडे आहे. अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, अशी धमकी किरीट सोमय्यांनी नाईकांना दिली होती. धमकीनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी उद्योजकांना भाजपला संपवायचे आहे. अन्वय नाईक यांचे हे सर्व गुन्हेगार आहेत. आता एक गुन्हेगार तिथे जात आहे.

सोमय्या नेल्सन मंडेला आहे का? ते तुरुंगात जातील हे मी कालच सांगतिले होते. ते तुरुंगात जाण्यासाठी आता मार्ग शोधत आहेत. लवकरच जनता त्यांच्या मागे ते पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. मी बंगले दाखवा, असे आव्हान मी दिले होते. त्यांचीच बेनामी संपत्ती सोमय्यांना दिसत असेल. याबाबत मी वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. सरपंचांनीही याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे हा आता भुताटकीचा प्रकार दिसू लागला आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

उद्योजक अन्वय नाईक प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली होती. या अटकेवरून मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. गोस्वामींना अटक होताच त्यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. भाजपचे आमदार राम कदम यांनी तर गोस्वामींच्या अटकेचा निषेध म्हणून उपोषण केले होते. आता याच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सोमय्या अडकण्याची शक्यता आहे. राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे सोमय्यांना कारवाईची टांगती तलवार आहे.

दरम्यान, राऊत आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (ता.17) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. या भेटीनंतर राऊत सूचक वक्तव्य करीत या प्रकरणी मोठ्या घडामोडीचे संकेत दिले आहेत. या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्याच्या आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे आहे. आम्ही कागदपत्रांबाबत पक्के आणि ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांना आजच भेटलो असे नाही. मी सतत त्यांना भेटत असतो. एखादा नेता पक्ष प्रमुखाला भेटतो म्हणजे नेमके काय होत तर राजकीय चर्चा होत असतात. राज्यातील घडामोडींबाबत चर्चा होते. मुख्यमंत्र्यांना मी सतत भेटत आहे याचा अर्थ असा आहे की वेट अँड वॉच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT