Abdul Sattar : Sanjay Raut : Santosh Bangar
Abdul Sattar : Sanjay Raut : Santosh Bangar Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News: राऊतांवर शिंदे गट आक्रमक : सत्तार म्हणाले, 'परिणाम चांगले होणार नाही' तर बांगरांकडून 'डाकू' उल्लेख..

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Budget Session : शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो अशी घणाघाती टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती.

यावर राज्य विधिमंडळामध्ये जोरदार घमासान घडून आले. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात यावा अशी मागणी सत्ताधारीआमदारांकडून आली. याबाबत दोन दिवसात विचार करून निर्णय घेऊ असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटले आहे. यावर आता पुन्हा राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातले आमदार आक्रमक झाले असून, त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, 'संजय राऊत यांच्यावर तातडीने कारवाई करून, त्यांना अटक करण्यात यावी. राऊतांना जर शिक्षा झाली नाही तर, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. त्यांच्यावर आणला जाणारा हक्कभंग जलदगती न्यायालयासारखा असावा,असे सत्तार म्हणाले.

तर दुसरीकडे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी तीव्र शब्दात राऊतांवर टीका केली आहे. बांगर म्हणाले,"संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतात, आणि आम्हालाच चोर म्हणतात. संजय राऊत डाकू आहे डाकू. त्यांच्यावर ३९५ कलमनुसार गुन्हादाखल करावा, अशी मागणी बांगरांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT