Chandrkant Patil Sanjay Raut
Chandrkant Patil Sanjay Raut sarkarnama
मुंबई

बदनामी करणं हा चंद्रकांतदादांचा राजकीय धंदा ; राऊतांचा पलटवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''भाजपची (BJP) दळभद्री आरोप करण्याची संस्कृती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी जे काही आरोप केलेत ते मला मान्य नाही. यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा नाही तर त्यांच्या लायकीनुसार सव्वा रुपयाचा दावा ठोकणार,' अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दोन दिवसापूर्वी केली होती. त्यावर पाटलांनी 'किंमत वाढवावी,' असे म्हणून उत्तर दिले होते. त्याला राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (shiv sena sanjay raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरुद्ध सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी किंमत वाढवी असे म्हटलं आहे. संजय राऊतांची किंमत एवढी नाही असेही पाटील यांनी म्हटलं होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही. मानहानीचा दावा स्वाभिमानासाठी असतो. विरोधक राजकीय दृष्ट्या आरोप करत असून हा त्यांचा राजकीय धंदा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी भाजपच्या घोटाळ्यांबाबत योग्य वेळी सगळं काढू असा इशाराच भाजप नेत्यांना दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (mp sanjay raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांना मानहानीची किंमत वाढवण्याबाबतचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले राऊत म्हणाले, ''प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. प्रश्न स्वाभिमानाचा असतो. अब्रुची आणि स्वाभिमानाची कोणती किंमत होत नाही. हजार कोटी, ५०० कोटी ती एक लढाई असते. तुम्ही खोटं बोलतात, तुमच्याकडे माहिती नाही. तुम्ही जाणीवपुर्वक बदनामी करत आहात. तुमचा तो राजकीय धंदा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब द्यायला लागेल. रुपया, सव्वाकोटी हे रुपये फक्त आकडे दाखवायला असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा, शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. तुम्ही त्यांच्यावर चिखलफेक करु शकत नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT