Sanjay raut Ekanath Shinde
Sanjay raut Ekanath Shinde  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो ; मध्यावधीबाबत राऊतांचे स्पष्ट संकेत!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर टीका करतानाच महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाबाबत एक सूचक विधान केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. आता हाच धागा पकडत राऊत म्हणाले की, "फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे कायम असतो, हे लक्षात घ्या." या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

शिवसेनेचे नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर हे मात्र ठाकरे गटात कायम राहिले. यावर बोलताना राऊत म्हणाले, अमोल किर्तीकर हे आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबत राजकीय प्रवासात सोबत राहिले आहे. ते शिवसेनेबरोबर आहेत. अमोलने वडिलांना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. किर्तीकर यांच्याविषयी आता आम्ही बोलणं थांबवलं आहे. गजाभाऊंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी दुर्देवी आहे. आम्हाला अनेक लोकं सोडून गेली, पण गजाभाऊ जाण्याचं दु:खं आम्हाला जास्त आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात ते खरंय की, मध्यावधी निवडणुका होतील. कोणता गट काय मतं व्यक्त करतो, त्यात मला पडायचं नाही. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. शिंदेच्या गटातच मोठी फूट पडण्याची मोठी तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे कायम असतो, हे लक्षात घ्या, असे सूचकपणे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT