sanjay raut Latest News
sanjay raut Latest News sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : कोण आला रे..कोण आला..शिवसेनेचा वाघ आला..आर्थर कारागृहाबाहेर शिवसैनिकांची गर्दी

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसानंतर आर्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. (sanjay raut Latest News)

न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने विरोध केला होता. यावर पुन्हा दुपारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी ईडीची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राऊतांचा घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Sanjay Raut, ED, Latest News)

दरम्यान,राऊतांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते काहीच वेळात कारागृहाबाहेर पडणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करायला सुरूवात केली असून फटाक्याची आतीषबाजी करण्यात येत असून कोण आला रे..कोण आला..शिवसेनेचा वाघ आला..,अशा घोषणा शिवसैनिकांकडून देणयात येत आहेत.

पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाल्यावर ईडीकडून पुन्हा राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करण्यात आली होती. मात्र, यावर लगेच सुनावणी द्यायला कोर्टाने नकार दिला असून यावर उद्या यावर सुनावणी होणार आहे.

मात्र राऊतांच्या जामिलास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे ते काही वेळातच कारागृहातून बाहेर पडणार आहेत. त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत हे नुकतेच कारागृहात पोचले असून कारागृह प्रशासनाची कागदपत्राची औपचारिकता पुर्ण केली जात आहे. ती झाली की संजय राऊत (Sanjay Raut) कारागृहाबाहेर येणार आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिकांनी गर्दी केलेली दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT