Sanjay Raut : Devedra Fadnavis : Rahul Kul  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut Tweet: संजय राऊत हे राहुल कुल यांचा पिच्छा सोडेनात; फडणवीसांनी दखल न घेतल्याने सीबीआयला पत्र !

Sanjay Raut Tweet On Rahul Kul: "फडणवीसांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले.."

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut Letters To CBI: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार प्रहार कला आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना कथित घोटाळा प्रकरणाबाबत राऊत यांनी भाष्य केले आहे. याप्रकरणी आता राऊतांनी सीबीआयकडे तक्रार दिली आहे.

या कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांनी ट्विट करून याबाबतीत माहिती दिली होती. यासंदर्भात काही कागदपत्रेही राऊतांनी सादर करत घोटाळा झाल्याचे दावा केला आहे. यामुळे आता भाजप समर्थक आमदार राहुल कुल (Rahul Kul)यांची यासंदर्भात चौकशी होणार का? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊतांनी मागील काही दिवसांपासून भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना आणि भाजपा आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचार केल्याबाबत गंभीर आरोप लावले आहेत. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा, राऊतांकीडून करण्यात आला आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचे राऊत यांनी सांगितले होते. आता यावरून पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधत राऊतांनी सीबीआयकडे तक्रार दाखले केल्याचे सांगितले आहे.

संजय राऊतांचं ट्वीट -

संजय राऊत म्हणाले, "आपण या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे तक्रार मी केली आहे. फडणवीसांनी माझ्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच आता मी सीबीआयचे दार ठोठावले आहेत. पाहूयात पुढे काय होतंय”, असं संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT