Uddhav Thackeray, Sanjay Raut News
Uddhav Thackeray, Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

संजय राऊतांचे बंधू सुनील राऊतांना अचानक 'मातोश्री' वरुन बोलावणं...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. यामुळे ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. ईडीकडून त्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. यामुळे संजय राऊत हे आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्ये असणार आहेत.

दरम्यान संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केला असून १६ सप्टेंबरपर्यंत ईडीला याबाबत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना आज अचानक 'मातोश्री'वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावून घेत संजय राऊत यांची विचारपूस केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुनील राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray, Sanjay Raut News)

सुनील राऊत यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले. ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले, तरी ते आता राऊत कुटुंबाचेही प्रमुख आहेत. यामुळेच त्यांनी मला बोलावले आणि त्यांनी आमच्या कुटुंबाची विचारपूस केली, असे सुनील राऊतांनी सांगितले.

सजंय राऊत यांना जामीन कधी मिळणार याबाबत सुनिल राऊतांना विचारण्यात आले. यावर बोलतांना ते म्हणाले की, त्यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला असून मला खात्री आहे की, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने लवकरच त्यांना जामीन मिळेल,असा विश्वासही सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र प्रत्यक्षात सरकार हे देवेंद्र फडणवीसच चालवत आहे. आमचं सरकार चालवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री मजबूत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं. ते जगातले कुठलेही मुख्यमंत्री करू शकत नाही. ठाकरेंच्या प्रयत्नामुळेच कोरोना अटोक्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच दसरा मेळाव्याबाबत बोलतांना ते म्हणाले की, दसरा मेळावा हा शिवसेनेचा होता हा इतिहास असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. पुढे ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे. कोणी कितीही दावा केला तर ओरिजनल ते ओरिजनल अन् गद्दार ते गद्दराच राहणार,अशी टीकाही सुनील राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT