navneet rana, Sanjay Raut
navneet rana, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

''डी गॅंग'च्या लकडावालाकडून नवनीत राणांनी घेतले 80 लाखांचे कर्ज!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राणा दांम्पत्य आणि शिवसेना (shivsena) हा वाद काही मिटण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता राणा यांची चौकशी करणार का असा राऊत यांनी केला आहे.

युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी कर्ज घेतले आहे. लकडावाला हे डी गँगशी संबंधित नाव असून त्याच्याकडून राणांनी हे 80 लाखांचे कर्ज घेतल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी राणांचे एक अॅफिडेव्हीट शेअर केले आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.

लकडावाला यांना व्यक्तीला ईडीने दाऊदसी संबंध असल्याचा आरोप करत ताब्यात घेतले होते. लकडावाला यांचा ईडीच्या कस्टडीमध्ये असताना मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मंत्री नवाब मलिक यांनाही दाऊदशी संबंध असल्याचे कारण देत ईडीने अटक केली आहे. आता त्याच पद्धतीने नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांचा संबंध असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राणा यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी ट्वीट करत नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डी कंपनीशी संबंधीत असलेल्या लकडावाला यांच्याकडून खासदार आणि आमदार जर कर्ज घेत असतील तर हे प्रकरण गगंभीर आहे, असे लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT