Sanjivraje Naik Nimbalkar
Sanjivraje Naik Nimbalkar 
मुंबई

फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांना कोरोनाचा संसर्ग

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले त्यांच्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच संजीवराजे नाईक-निंबाळकर हे कोरोनाबाधित झाल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांनी धास्ती घेतली आहे. 

सातारा जिल्ह्यातील राजकिय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. सुरवातीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते बरे होऊन घरी गेल्यानंतर सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या निकट सहवासित कार्यकर्ते व नागरीकांनी क्वारंटाईन होऊन आपापली कोरोनाची तपासणी करून घेतली आहे.

त्यामध्ये त्यांच्या ताफ्यातील पोलिस वगळता इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जवळच्या तसेच संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः विलगीकरण करून घ्यावे. तसेच कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी असे अवाहन नाईक निंबाळकर कुटुंबियांनी केले आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहेत.  सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वजनदार नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याने लोकप्रतिनिधींनी आता जनतेच्या संपर्कात येताना विशेष काळजी घ्यावी, असा सल्लाही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT