मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस पक्षाशी (Congress) असलेले सर्व संबंध तोडल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांना आपला फेसबुक आणि ट्विटरचा डीपी बदलला असून काँग्रेसशी संबंधित सर्व पदांचा उल्लेख त्यांनी आपल्या सोशल मीडियातून हटवला आहे. तसेच, ‘वारसाने संधी मिळते; परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं- सत्यजित तांबे’ असे प्रोफाईल ठेवले आहे, त्यामुळे तांबे यांनी आपण मागे हटणार नसून लढणार असल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे. (Satyajeet Tambe changed DP on social media)
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण हे सत्यजित तांबे या नावाशेजारी फिरत आहे. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असतानाही त्यांंनी अर्ज भरली नाही. त्यांचे सुपुत्र सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याचे आता हळूहळू उघड होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्यजित तांबे यांच्या कामाचे कौतुक करत त्या पाठिंबा देण्याबाबतचे संकेत दिले होते. तसेच, माजी मंत्री राम शिंदे यांनीही नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सत्यजित तांबे यांना यापूर्वीच सांगितले आहे, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच, आज काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून सत्यजित तांबे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी अशी सूचना महाराष्ट्र प्रदेश कमिटीला केली आहे.
दरम्यान, सत्यजित तांबे यांनीही नाशिक पदवीधर मतदारसंघाची लढाई संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी भाजपकडे पाठिंबा मागण्याची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावरील सर्व प्रोफाईल हटवून त्या ठिकाणी तांबे यांनी ‘वारसाने संधी मिळते; परंतु कर्तृत्व सिद्ध करावं लागतं’ असा डीपी ठेवला आहे. तसेच, फेसबुक, ट्विटरवरील काँग्रेसच्या सर्व पदांचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसशी असलेले नाते तोडल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.