Satyajit Tambe
Satyajit Tambe Sarkarnama
मुंबई

सत्यजित तांबे लागले वजन वाढविण्याच्या प्रयत्नाला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसमध्ये (Congress) वर्चस्वावरून चढाओढ सुरूच असतानाच युवक काँग्रेसचे (Youth Congress) प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आता पक्षात आपले ‘वजन’ वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून तांबे आणि त्यांची टीम सक्रिय झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत तरुणांसाठी उमेदवारीचा वाटा मागून त्यांना निवडून आणण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करीत आहेत.

तांबे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी नवनवीन उपक्रम राबव आहेत. त्यांनी संघटनेतही ३३ टक्के महिला आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील हुशार युवक-युवतींना उमेदवारी दिल्याने आज ६८९ पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि ११ जण नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले.

प्रदेश युवक काँग्रेसने आज (ता.29 ऑक्टोबर) आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्रभरातून आलेल्या युवक-युवतींना तांबे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी २ वेळा लढविलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची माहिती दिली. याबरोबरच सोशल मीडियाचे महत्व सांगितले. कार्यक्रमात तांबे यांनी चांगले काम करणाऱ्या युवक-युवतींची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच, येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वसामान्य घरातील युवक-युवतींना उमेदवारी देण्याचा आणखी १ महत्वाचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतल्याचे सांगितले.

तसेच, गेल्या काही महिन्यात झालेल्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाल्याचे सांगत, यापुढील काळात नव्या उमेदीने काम करणार असल्याचे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT