save vikrant fund sarkarnama
मुंबई

आयएनएस विक्रांतचा निधी कुठे गेला ? दोन दिवसांनी सोमय्यांनी दिलं राऊतांना उत्तर

जमा केलेला निधी राज्यपाल भवनाला दिला का नाही, हे सोमय्यांनी सांगावे,' यावर राऊत आग्रही आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) असे शाब्दीक युद्ध सध्या सुरु आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमय्या (kirit somaiya)यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant) गंभीर आरोप केले आहेत.

याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी अभियान सुरू केले होते.

या अभियानतून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, हे पैसे राज्यपाल यांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याच्या विरोधात कलम ४०६, ४२०, ३४ भा द वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'आयएनएस विक्रांत या युद्धनैाकेच्या डागडुजीसाठी सोमय्यांनी जमा केलेला निधी राज्यपाल भवनाला दिला का नाही, हे सोमय्यांनी सांगावे,' यावर राऊत आग्रही आहेत. तर दुसरीकडे सोमय्यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, पण त्याबाबतचे पुरावे द्यावे, असे सोमय्यांनी माध्यमांना सांगितले आहे. ''निधी जमा करा, मग मी पुरावे देतो,'' असे राऊतांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, ''आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता,''

''काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केलं होतं. मग त्यांनी किती पैसे गोळा केले?'' असं किरीट सोमय्या म्हणाले. मुंबई पोलीस ऐकीव माहितीवर एफआयआर कशी दाखल करू शकतात? एकही कागद नसताना त्यांनी एफआयआर कशी करून घेतली? असा प्रश्न सोमय्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला आहे.

निवृत्त युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. मात्र हा निधी राजभवनात जमा केला नाही, अशी माहिती समोर आली आहे. ''सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावावर निधी जमा केला. हा पैशा सोमय्यांनी पीएमपी बॅकेच्या माध्यमातून चलनात आणला. हा निधी फडणवीसांनी निवडणुकीसाठी वापरले,'' असा आरोप राऊतांनी काल पत्रकार परिषदेत केला. हा सर्व प्रकार मनी लाँड्रिंगचा असल्याचे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT