vidhan Bhavan  
मुंबई

विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की; पहा व्हिडीओ

Shinde Group| Mahavikas Aghadi| पण खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (monsoon session) दरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पााहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. घोषणाबाजी करत दोन्ही गट आक्रमक झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार रोहित पवार यांनी तातडीने मध्यस्थी करुन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) पाचवा दिवस आहे. गेले चार दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. आज मात्र या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर दूसरीकडे विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यावर

पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देण बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात येत होती. तर लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के अशी घोषणाबाजी शिंदे गटाकडून करण्यात येत होती. या घोषणाबाजीत अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही क्षणातच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली.

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ''आम्ही हसतखेळत घोषणाबाजी करत होतो. पण शिंदे नावाच्या कोणत्या एका आमदाराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी आईबहिणीवरुन शिव्या द्यायला सुरुवात केली. पत्रकारांनाही धक्काबुक्की केली. घोषणाबाजी करण्याचा अधिकार त्यांनाही आणि आम्हालाही. आम्ही शेतकरी प्रश्न, ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत होतो. पण खोक्यांवरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली,'' असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT