मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी केंद्रीय रस्ते,वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या तीन दिवसांत यासंदर्भात आदेश काढला जाणार आहे.
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यांनी सीट बेस्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, याचीही चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे.
काल नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत याबाबत महत्वाची घोषणा केली. कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे. सीट बेल्ट न लावता पकडल्यास दंडही भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
‘याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यास दंड होता, परंतु आम्ही मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावाने अनिवार्य करणार आहोत’ असे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले.
"सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवरील सीट बेल्टचा अलार्म असेल. कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. मी या संबंधित फाइलवर सही केली," असे गडकरी म्हणाले.
"कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले बहुतांश ड्रायव्हर आणि प्रवासी सीट बेल्ट लावतात, मात्र मागे बसलेले प्रवासी बेल्ट लावणे आवश्यक मानत नाहीत. याबाबत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी टि्वट करीत वाहनचालकांना सीट बेस्ट लावण्याचे आवाहन नुकतेच केले आहे.
"मी नेहमी माझा सीट बेल्ट गाडीच्या मागील सीटवर देखील घालतो आणि मी तुम्हा सर्वांना सीट बेल्ट वापरण्याची विनंती करतो," असे आनंद महिंद्रा यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.