Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या स्फोटक मुलाखतीचा दुसरा टिझर प्रदर्शित; लवकरच राजकीय धमाका?

Uddhav Thackeray News: राज्यातील राजकारणासंदर्भात उद्धव ठाकरे मुलाखतीत मोठ गौप्यस्फोट करण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: शिवसेनेत झालेल्या फूटीनंतर, एकनाथ शिंदेंकडे पक्ष गेल्यानंतर आणि अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रखर मुलाखत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत हे घेणार आहेत. या मुलाखतीचा पहिला टिझर सोमवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर आज पुन्हा दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला. या प्रोमोमध्ये वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत, असं म्हटलं आहे.

या मुलाखतीच्या टिझरमधील संभाषणात संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना अनेक प्रश्न विचारत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?, लोकशाही वाचणवणार का?, भाजपला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते?, यासह अनेक प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारलेत. तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिले असून ठाकरे अजून काय गौप्यस्फोट करणार हे मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर समोर येणार आहे.

उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत घेणार आहेत. या मुलाखतीचा पहिला भाग 26 जुलैला सकाळी 8 वाजता आणि दुसरा भाग 27 जुलैला सकाळी 8 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या.

शिवसेनेने (ठाकरे गट) भाजपची साथ का सोडली?, शिंदेंनी बंड का केलं, पक्ष फूटीनंतर ठाकरेंची शिवसेना कशी वाढणार? राष्ट्रवादीच्या फुटीबाबत ठाकरे काय बोलणार?, अशा अनेक प्रश्नांवर ठाकरे काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT