भोपाळ : भाजप (bjp) सरकारच्या राज्यातच एका महिला भाजप खासदारालाच वाईट वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खासदार संतप्त झाल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं. (Sumitra Valmiki news)
जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी गेस्ट हाऊसचे कर्मचारी हरिनारायण कोरी यांना निंलबित केले आहे. याशिवाय दंडाधिकारी, आणि प्रोटोकॉल अधिकारी सपना त्रिपाठी यांना कारणे दाखवा, नोटिस बजावण्यात आली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुमित्रा येथे प्रोटोकॉल कोण पाहत आहे, असे विचारताना दिसत आहे. खासदार सुमित्रा विचारत आहे, की “सामान कोणी उचलले आणि फेकले. त्यात अंतरवस्त्रे देखील होती,"
ही घटना मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) सागर जिल्ह्यात घडली. याबाबत भाजपच्या खासदार सुमित्रा वाल्मिकी (MP Sumitra Valmiki) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना फटकारताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांनी त्यांचे सामान सर्किट हाऊसच्या खोलीतून बाहेर फेकले होते. याप्रकरणी वाल्मिकी यांनी भोपाळमध्ये तक्रार दाखल केली आहे.
सागर येथे वाल्मिकी समाजाचे अधिवेशन नुकतेच आयोजित केले होते. यासाठी राज्यसभा खासदार सुमित्रा वाल्मिकी या उपस्थित होत्या. या अधिवेशनाला आलेल्या सुमित्रा यांचे स्वागत करण्यासाठी भाजपचा एकही नेता आलेला नव्हता. सुमित्रा यांना सर्किट हाऊसमधील रुम क्रमांक 3 देण्यात आली होती. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, परत आल्यानंतर त्यांना त्यांचे सामान खोलीबाहेर पडलेले दिसले.
"ही खोली एका मंत्र्याला देण्यात आली होती, त्यामुळे सुमित्रा यांचे सामान बाहेर ठेवण्यात आले होते, असे सर्किट हाऊसच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर आता वाल्मिकी समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी संबधीतांवर कारवाईची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.