Sharad Pawar News, Deepak Kesarkar news, Political News , Rajkiya Batmya  sarkarnama
मुंबई

Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

राज ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला देखील पवारांचा पाठिंबा होता," असे दीपक केसरकरांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा काय संबध होता, याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. (Deepak Kesarkar news update)

"शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवारांचा हात होता," असा गंभीर आरोप केसरकरांनी केला. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

केसरकर राष्ट्रवादीत होते. त्यावेळचा किस्सा त्यांनी सांगितला. "नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. राणेंनी कोणत्या पक्षात जावे, याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी मला सांगितले होते," असा दावा केसरकरांनी केला आहे.

छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर काढत आपल्यासोबत घेतले आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाला देखील पवारांचा पाठिंबा होता," असे दीपक केसरकरांनी सांगितले.(Sharad Pawar News in Marathi)

केसरकर म्हणाले, "मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली ? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे,"

"राष्ट्रपती पदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर येतो, मातोश्रीतील कुणी दिल्लीत जात नाही, अशी महती आहे, आणि कायम राहावी," असा टोला केसरकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT