sharad pawar sarkarnama
मुंबई

Sharad Pawar: शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत काय दिली अपडेट?

Sharad Pawar Discharge From Breach Candy Hospital: काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आधी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं अॅडमिट करण्यात आलं होतं, त्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार पार पडले, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Amit Ujagare

Sharad Pawar Discharge From Breach Candy Hospital: काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळं ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आधी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं अॅडमिट करण्यात आलं होतं, त्यानंतर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार पार पडले, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.

प्रकृतीबाबत अपडेट

ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितलं की, "शरद पवारांना सध्या डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील उपचार आता घरी होतील. त्यांना ब्रॉकायटिसचा अटॅक आला होता, तसंच त्यांना इन्फेक्शन झालं होतं, त्यामुळं छातीत दुखत होतं. पण आता ते बरे होत आहेत. ज्याप्रमाणं देशातील प्रत्येक नागरिकाला अशा परिस्थितीत काळजी घेण्याचा सल्ला त्यांनाही देण्यात आला आहे. पण त्यांचं वय पाहता त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवार हे डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळतात त्यामुळं ते आपल्या प्रकृतीची नक्कीच काळजी घेतील, अशी अपेक्षा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

१० नोव्हेंबरला बैठक?

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची फोनवरुन विचारपूस केली होती. त्याचबरोबर राज्यातील अनेक बडे नेते त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. यामध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होता. तसंच राहुल गांधी यांनी देखील शरद पवारांची विचारपूस केली होती.

पण प्रफुल पटेल यांच्याशी रुग्णालयातील या भेटीमध्ये शरद पवारांनी १० नोव्हेंबरला भेटण्याबाबत काहीतरी सांगितलं होतं. अलिबाग इथं एखाद्या कार्यक्रमाबाबत त्यांच्या चर्चा झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. तसंच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाचा मुद्दा देखील पुन्हा एकदा चर्चेत आला जो अद्यापही चर्चेत असून आता भाजपनं यावरुन तटकरेंना टार्गेट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT