Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Vs Sharad Pawar : अजितदादांच्या बॅनरवर थेट तामिळनाडूतील मुलीचा फोटो; शरद पवार गटानं फोडलं नव्या वादाला तोंड

Jansanman Yatra Of NCP : पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कात टाकली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या प्रचारातही मोठा बदल करण्यात आला आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभेत महायुतीला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महायुती सरकारने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींसाठी मोठ्या योजनांचा पाऊस पाडल्याची टीका विरोधक करत आहेत. आता विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना महायुतीकडून याच योजनां मतदारांपर्यंत पोचवल्या जात आहेत.

यातील विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाच्या जाहिरातीसाठी अजित पवार गटाने तामिळनाडूतील एका विद्यापीठाच्या वेबसाईटवरील मुलीचा फोटो वापरल्याचे पुढे आले आहे. त्यावरून शरद पवार गटाने अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला Ajit Pawar फक्त एक जागा मिळाली आहे. हा भूतकाळ विसरून पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी कात टाकली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या प्रचारातही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पक्षाने शेतकऱ्यांसह महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या योजना मतदारांपर्यंत पोचवण्यात येत आहे.

सध्या अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे. तसेच लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण या योजनांची जोरदार जाहीरात केली जात आहे. विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाच्या जाहिरातीत मात्र तामिळनाडूतील एका विद्यापीठाच्या जाहिरातीतील मुलीचा फोटो वापरल्याचे पुढे येत आले.

या जाहिरातीवरून शरद पवार गटाने Sharad Pawar अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आता महाराष्ट्रात मुलींना फ्री शिक्षणाच्या योजनेचा पत्ता नाही. त्यामुळेच अजित पवारांना 'गुलाबी यात्रे'च्या जाहिरातबाजीत तामिळनाडूच्या मुलीचा फोटो घेण्याची नामुष्की आली असल्याची टीका शरद पवार गटाने केली आहे. याबाबत शरद पवार गटाने ट्विटद्वारे अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT