Mumbai News, 10 Jul : मागील काही दिवसांपासून जेष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचं जे केलं तेच पवारांच्या राष्ट्रवादीचं होऊ शकतं. खासदार सोडून जातील की नाही माहिती नाही मात्र ते अस्थिर आहेत, असं चव्हाण यांनी वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचे खासदार एनडीएमध्ये सहभागी होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या चर्चा आणि चव्हाण यांच्या वक्तव्यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या पक्षात कोणीही नाराज नसल्याचं म्हणत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील आमचा पक्ष एनडीएसोबत जाणार नसल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "शरद पवारांचे ५ ते ५ खासदार अस्वस्थ असून ते काय करतील माहिती नाही. मोदी-शाह सरकार हात धुवून लागलेलं आहे, विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा, अशी त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जे केलं तेच पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं होऊ शकतं. खासदार सोडून जातील की नाही माहिती नाही मात्र ते अस्थिर आहेत, असं ऐकतोय," असं मोठं वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.
यावर आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही आठ खासदार एकसंघ असून आम्हीसगळे सुप्रिया ताईंच्या नेतृत्त्वात सभागृहात काम करतो. शरद पवार साहेबांच्या आदेशानं, सहकार्यानं काम करतो. आम्हाला ऑफर यायचा प्रश्नच नाही, आम्ही ऑफरच्या पलीकडे आहोत, असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आताच शरद पवारांचा पक्ष एनडीएत सामील होण्याच्या चर्चांना आता उधाण का आलं आहे? आणि चर्चांमध्ये काही तथ्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.