Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar gets death threat: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी फोन करुन पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोमवारी (दि.12) 82 वाढदिवस साजरा करण्यात आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून पवारांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. एकीकडे पवार यांच्या वाढदिवसामुळे पक्षात उत्साहाचं वातावरण असताना पवार यांनी धमकीचा आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलिसांकडून धमकीच्या फोननंतर आता मुंबई पोलिसांकडून या घटनेकडे गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून फोन करणार्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा पवारांच्या सुरक्षितता वाढविण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

''...पण हे संकेत सध्याच्या पंतप्रधानांकडून पाळले जात नाही..''

मी आतापर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यानंतरचे वेगवेगळ्या पंतप्रधानांना ऐकलं आहे. त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला गेल्यानंतरही विरोधी पक्षाची सरकारं असली तरी त्यांच्यावर कधी टिप्पणी केली नाही. त्यांनी आपली भूमिका मांडली. पण विरोधक, विरोधी पक्षनेता, विरोधी पक्ष याही लोकशाहीच्या संस्था आहेत, त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे हे संकेत आपल्या देशाच्या जवळपास प्रत्येक पंतप्रधानांनी पाळले. पण आज काही हे पाळलं जात नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT