Nawab Malik Sarkarnama
मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसची मोठी घोषणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सदस्य नोंदणी, ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, पक्षाचे नियोजित शिबिर आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. राज्यातील १३ मंत्री ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, रॅली, बैठकांमुळे कोरोनाची प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉग्रेसची महत्वाची बैठक मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेण्यात आली. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी सदस्य नोंदणी, ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज संस्था निवडणूक, पक्षाचे नियोजित शिबिर आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीची माहिती पक्षाचे प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी माध्यमांना दिली. पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती मलिक यांनी दिली.

'गर्दी होतील असे कार्यक्रम घेऊ नये,' असे या बैठकीत उपस्थित मंत्री, नेत्यांनी ठरविले. गर्दी रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

''मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षातंर्गत होणार्‍या निवडणुकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमांचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे,'' असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक म्हणाले, ''आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आली आह

मंत्री, आमदार सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राजकीय व्यक्तींच्या सभा, रॅली, लग्नसोहळे यामुळे हे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी २० आमदार, १० मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता ही संख्या वाढत आहे. आता ७० आमदार, १३ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्यात अधिक प्रमाणात नेत्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळ चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT