Sharad Pawar News : Sharad Pawar Resigns News :
Sharad Pawar News : Sharad Pawar Resigns News :  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : ठरलं! राष्ट्रवादीचा अध्यक्ष ५ मे लाच होणार...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार हे फेरविचार करतील का? याबाबत चर्चांना उधाण येत आहे. आता यासर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. (Latest Marathi News)

पक्षातील वरिष्ठ आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. त्यामुळे ६ मे रोजीची आयोजित बैठक ही ५ मे ला घ्या, समिती जे निर्णय घेईल ते मला मान्य असेल. कार्यकर्त्यांसोबत बैठकीत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी हे यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करत होते. त्यांना आतून शरद पवार यांनी निरोप पाठवला आहे. त्यांच्याशी पवार यांनी २० मिनिटे चर्चा केली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी दबाव वाढत आहे. यानंतर पवार यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला आहे.

६ मे ची वाट पाहू नका. ५ मे लाच यासंबंधी बैठक घ्या. या बैठकीसाठीची पूर्वतयारी म्हणून आज सायंकाळी ७ वाजता पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक आयोजित केली आहे. या मध्ये प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल. या बैठकीत ५ तारखेच्या बैठकीची दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT