Sharad Pawar Statement On Pruthviraj Chavhan :
Sharad Pawar Statement On Pruthviraj Chavhan :  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : 'लोकांचं माहिती नाही, पण आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, पृथ्वीराज चव्हांणांबाबत पवार असं का म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Statement On Pruthviraj Chavhan : शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे.

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, आज मुंबईतील बाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भावनांचा विचार करून, आपण निवृ्त्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavhan) यांनी केलेल्या टिकेवर पवारांनी भाष्य केले आहे. चव्हाणांच्या टिकेवर पवार म्हणाले,"काही लोकांची पक्की मतं असतात, पक्की मतं असणाऱ्यापैकी ज्याचं नाव तुम्ही घेतलं ते आहेत. त्याचं पक्कं मत असं असतं. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळेला मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला, तर त्याचं मत आमच्या पक्षाच्या प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्यांना कधी गांभीर्याने घेत नाही. आणि लोक त्यांना कितपत गांभीर्याने घेतात ते मला माहिती नाही."

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

महाविकास आघाडीत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू आहे, असा गंभीर आरोप चव्हाणांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT