Sanjay Raut on Narendra Modi and Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "राजकारणात शरद पवारांचं स्टेटस PM मोदींपेक्षा मोठं..."; पंतप्रधानांच्या 'त्या' कृतीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut on Narendra Modi and Sharad Pawar : PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. या संमेलनात मोदींनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिल्याचं आणि स्वत:च्या हाताने त्यांना पाणी दिल्याच्या कृतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Jagdish Patil

New Delhi News, 22 Feb : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.21) दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते. या संमेलनात मोदींनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची दिल्याचं आणि स्वत:च्या हाताने त्यांना पाणी दिल्याच्या कृतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

मोदींच्या या कृतीनं सर्वांची मन जिंकली असून सगळे त्याचं कौतुक करत आहेत. शिवाय याच कार्यक्रमात पवारांनी मोदींचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. आता या सर्व प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, स्वागताध्यक्ष व्यक्तीला शिष्टाचार पाळावा लागतो. शरद पवारांचा स्वभाव पाहता त्यांचं चांगलं भाषण झालं.

दरम्यान, शरद पवारांना (Sharad Pawar) मोदींनी खुर्ची आणि पाणी दिल्याच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले, मी या घटनेकडे तटस्थपणे पाहतो. दुसरं कोणी असतं तर त्यांनी देखील हेच केलं असतं. राहुल गांधी देखील खर्गेंना पाणी देतात, शिवसेनाप्रमुख यायचे त्यांना देखील आम्ही त्यांना खुर्ची द्यायचो. शरद पवारांचं जे राजकारणातलं स्टेटस ते मोदींपेक्षा मोठं आहे. पंतप्रधान असल्यामुळेच किंवा पद असल्यामुळे ठीक आहे.

पण राजकारणातील काम अनुभव सगळं पाहिलं तर ते एक महाराष्ट्राचं देशाचं टोलेजंग व्यक्तिमत्व आहे. मोदींना जीवनामध्ये राजकीयदृष्ट्या मदत करणारी दोन नावे आहेत. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही दोन नावे असून ते मोदींना देखील मान्य करावं लागेल. तर पंतप्रधानांनी मराठी भाषेसाठी साहित्य संमेलनाला साजेसं भाषण केल्याचंही राऊत म्हणाले.

ते म्हणाले, मी तेव्हाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंचं भाषणही वाचलं आहे. आता मोदींचंही भाषण ऐकलं. पंतप्रधानांनी मराठी भाषेसाठी आणि साहित्य संमेलनाला साजेसं भाषण केलं. मोदींची भाषणं आवडत नाही असं नाही. पण त्यांची आधीची भाषणं चांगली होती. आताची भाषण खूपचं साचेबंद असतात असंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT