Sharad Pawar | Raj Thackeray
Sharad Pawar | Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

"प्रत्येक निवडणुकीचा नारळ कुठे फुटतो हे बारामतीकरांना विचारा" : पवारांचे प्रत्यूत्तर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल ठाण्यात 'उत्तर' सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेकांनी तारे तोडले होते, त्यांना उत्तर देण्यासाठी आजची सभा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले होते. यात बोलताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. यात शरद पवार हे नास्तिक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून भाषण करताना शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असा उल्लेख करतात. मुस्लिम मतांच्या भितीने ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. आमच्या मुलांची माथी भडकवली अशी टीका केली होती.

राज ठाकरे यांच्या याच टीकेला आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतुन प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, मी माझा देवं, धर्म यांचे प्रदर्शन कुठेही करत नाही. ६० वर्षांच्या काळात आजपर्यंत मी १३ ते १४ निवडणुकींना उभा राहिलो आहे. या निवडणुकांसाठीचा माझा नारळ कुठे फुटतो हे बारामतीच्या लोकांना विचारा. एकच ठिकाण आहे आणि एकच मंदिर आहे. कन्हेरीच्या मारूतीच्या मंदीरातून प्रचाराचा नारळ फोडूनच प्रचाराची सुरुवात केली जाते. पण आम्ही गाजावाजा करत नाही, असेही उत्तर पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला दिले.

माझ्यापुढे आदर्श आहे. प्रबोधनकार ठाकरे हे आदर्श आहेत. त्यांचं लिखाण जर राज ठाकरे यांनी वाचले तर तर त्यांना मार्गदर्शन होईल. देव अन् धर्म याचा बाजार मांडणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, त्यावर त्यांनी प्रचंड टीका केली. याचा अर्थ त्यांनी कोणत्या धर्माचा किंवा देवाचा अनादर करणे असा होतं नाही, पण त्याचा गैरफायदा घेणारा घटक असेल तर त्याला प्रबोधनकारांनी ठोकून काढले, त्यामुळे राज यांनी प्रबोधनकार वाचावे असे पुनरुच्चार शरद पवार यांनी काढले.

शरद पवार पुढे म्हणाले, आता जे वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे, त्यातून सामाजिक ऐकायला धक्का द्यायचा प्रयत्न आहे. सांप्रदायिक मांडणी करत आहेत, त्यामुळे राज्याची शांतता संकटात आहे. जनतेला आवाहन की त्यांनी याला बळी पडू नये, असेही पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT