Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Replied BJP : पाटणा बैठकीवरील भाजपच्या टिकेला पवारांचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले...

Sharad Pawar News : जर देशात जातीय तेढ वाढली तर ते समाजाच्या दृष्टीने योग्य नाही.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Replied to BJP: आम्ही बैठका घेतल्यावर तुम्हाला चिंता का वाटली, असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपला उत्तर दिलं आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी बिहारमधील पाटणा येथे देशातील १९ विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. यावर देशातील १९ पंतप्रधानांची बैठक झाली, अशी टिका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या या टिकेला शरद पवार (Sharad Pawar) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

"पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर सत्ताधाऱ्यांनी केलेली टिका हा खोडसाळपणा आहे. सत्ताधारी पक्षाचे काही नेते, हे लोक एकत्र कसे जमले, यांनी बैठका कशा घेतल्या असे प्रश्न विचारत आहेत. पण लोकशाहीत बैठका घेण्याचा अधिकार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांच्या बैठकीवर टिका केली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनीदेखील त्यांच्या मित्रपक्षांच्या बैठका बोलवल्या. तुम्ही बैठका घेऊ शकता, मग आम्ही बैठका घेतल्यावर तुम्हाला चिंता का वाटली, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार म्हणाले, "पाटण्यात झालेल्या बैठकीत पंतप्रधान पदाची चर्चाही झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि काही ठिकाणी सांप्रदायिक शक्ती वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. या माध्यमातून समाजात कशी दरी पडेल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. भाजप आज तशा प्रकारची पावले टाकत आहेत. जर देशात जातीय तेढ वाढली तर ते समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण एकत्र बसण्याची गरज आहे, हा चर्चेचा विषय होता."

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT