Sharad Pawar : Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Retirement: "भाकरी फिरवण्याचे संकेत पण तवाच फिरवला, इतिहासाची पुनरावृत्ती.." ; राऊतांचं सूचक ट्वीट

Sanjay Raut's Tweet On Sharad Pawar Retirement: बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला पण...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Resigns Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार फेरविचार करणार का? याबाबत अद्यापही सकारात्मक माहिती पुढे आली नाही. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना भरून आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील NCP) या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूचक ट्वीट केले आहे. राऊत आपल्या ट्वीट म्हणतात, "गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आज इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत." असे राऊतांनी ट्वीट केले आहे.

राऊत पुढे म्हणाले, "शरद पवार भाकरी फिरवणार असे म्हणाले होते, तसे त्यांनी संकेत दिले होते. भाकरी फिरवण्याचे संकेत होते. पण पवार साहेबांनी तवाच फिरवला," असे राऊत म्हणाले.

दरम्यान, अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. साठ दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन, असेही शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT