sanjay raut, ramdas kadam
sanjay raut, ramdas kadam sarkarnama
मुंबई

राऊतांनी शिवसेनेपेक्षा पवारांसाठी जास्त काम केले ; कदम यांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांची पाच तासांपासून ईडीचे दहा अधिकारी चौकशी करीत आहेत. ईडीनं केलेल्या कारवाईवर शिंदे गटातील आमदारांनी आनंद व्यक्त करीत आहेत. शिवसेनेतून नुकतेच शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. (Ramdas Kadam news update)

"मी संजय राऊत साहेबांना बोललो, साहेब थांबा, तोंड बंद ठेवा. पण ऐकतील ते संजय राऊत कसले. जेव्हा अजित पवार निधी देत नव्हते तेव्हा संजय राऊत का बोलले नाही, शिवसेना संपवविण्याचे काम राऊतांनी केले. राऊतांनी शिवसेनेपेक्षा शरद पवारांसाठी sharad pawarजास्त काम केले," असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम म्हणाले, "पक्ष संपला तरी चालेल पण शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करणार नाही. लोकांना किती दिवस फसवाल?, शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी केले तेच याचे साक्षीदार आहेत. मांजर डोळे झाकून दुध पित असेल तरी लोक पाहत असतातच ना.उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा राष्ट्रवादीने घेत निधी वाटपात दुजाभाव केला. तेव्हा संजय राऊत कुठे होते? ते का बोलले नाही,"

"राष्ट्रवादीशी युती संजय राऊतांनी घडवून आणली. माझे प्रयत्न भाजपसोबत जाण्याचे होते, पण राऊतांचे शरद पवारांसोबत जाण्याचे प्रयत्न सफल झाले. मी मातोश्रीवरुन परतलो. शिवसेना फुटते पण राऊत काहीच बोलत नाही. जेव्हा आमदार गुवाहाटीला जातात तेव्हा ते बोलत सुटले. मी त्यांना थांबा तोंड बंद ठेवा म्हटलो पण ते ऐकतील तर राऊत कसले," असा टोला रामदास कदम यांनी राऊतांना लगावला.

"जे शरद पवार शिवसेनेच्या मुळावर उठले, त्यांना साथ देत त्यांचेच राऊतांनी ऐकले याचे दु:ख आहे. यात उद्धव ठाकरेंचा दोष नाही, राऊतांनीच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला," असा आरोप कदमांनी यावेळी केला.

रामदास कदम म्हणाले...

  • राऊतांचा आणि माझा आजही संवाद आहे. त्यांना मी थांबाल का असे म्हटलो, थांबता आले तर थांबा बघा असे मी म्हटलो. त्यांचा पत्राकाळ प्रकरणात संबंध नाही असे ते म्हणाले तर ही बाब न्यायालयात सुटेल.

  • संजय राऊतांना टीव्हीवर बोलताना लोक आता कंटाळले. राऊतांनी शिवसेना वाचवण्याचे काम केले नाही. त्यांच्याकडून ते झाले नाही. यात उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही. ते आजारी होते, मंत्रालयात ते जात नव्हते, अजित पवारांना मोकळे रान मिळाले.

  • संजय राऊत स्ट्रॉग आहेत ते घाबरणारे नाहीत, ते ईडीला सामोरे जातील, ते सहकार्यही करतील. संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वांना ते उत्तरे देतात, मग ईडी-बीडी कसली काय आहे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT