Sharad Pawar statment on BJP, Sharad Pawar News, NCP News, Political News Updates 
मुंबई

शरद पवार म्हणाले, भाजपला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही...

BJP| Sharad Pawar| NCP| नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : "भाजपकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही”, असा विश्वास राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भारावलेले भाजप नेते आता 2024 च्या निवडणुकीतही महाराष्ट्रात (Maharasahtra) बहुमताने सत्तेत येऊ असा असा दावा केला आहे. भाजपाच्या या दाव्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. (Sharad Pawar News)

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून आता भाजपाने महाराष्ट्रातही सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यातील यशानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात २०२४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता येईल, असा दावा भाजपा नेते करत आहेत. या दाव्याला शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.

याचवेळी त्यांनी भाजपच्या काही गोष्टींकडेही लक्ष वेधले आहे. भाजपा आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. तरी त्यांच्या नेत्यांकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी (१८ मार्च) शरद पवार यांच्या निवासस्थदोन बैठका झाल्या. सकाळी सकाळीच महाविकास आघाडीचे तरुण आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली तर सायंकाळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे असलेली खाती काढून घेण्यात आली.

न्यायालयीन कोठडीत असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडील मंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याकडील कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे, तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे अल्पसंख्याक मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे मलिक हे बिनखात्याचे मंत्री राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT