Rahul Narvekar, Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले; क्रांतीकारी निर्णयानंतर...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar, Rahul Narvekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ''मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा झाली. नार्वेकर यांच्या विधानावर शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

शनिवारी (१० जून) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ''विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय घेणार आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक कधी होतील हे सांगता येणार नाही. मी विधानसभा क्षेत्रात जास्त लक्ष घालत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

तसेच राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) क्रांतीकारी निर्णय घेऊ असे वक्तव्य केल्याचे मी वाचले. ते काय क्रांतीकारी निर्णय घेतात याची आम्ही वाट पाहतो आहे. त्यांनी क्रांतीकारी निर्णय घेतला की, आम्ही त्यावर बोलू, असे पवार म्हणाले.

दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील 'दौलत'या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात नार्वेकर म्हणाले होते, ''त्यांनी समाज, राज्य व देशाच्या विकासात योगदान दिले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. मीही लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईल,''

त्यांनी ज्या-ज्या खात्यात काम केले, त्या खात्यात क्रांतीकारी निर्णय घेऊन आपला वेगळा ठसा उमठवला आहे. त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातून बरेचसे शिकून कदाचित मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन, असे सूचक वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले होते. नार्वेकर यांच्या या विधानानंतर राज्यात एकच चर्चा झाली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही नार्वेकरांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. पटोले म्हणाले होते, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आहेत. त्यामुळे ते क्रांतीकारी कोणता निर्णय घेतात, शेड्यूल 10 च्या वर जाऊन निर्णय घेतात काय? हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि मला वाटते की यामध्ये शेड्यूल 10 वरच निर्णय घ्यावा लागणार आहे. शेड्यूल 10 च्या वर गेले तर तो निर्णय क्रांतीकारी होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT