Sharad Pawar, Rohit Pawar  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar ED Enquiry : रोहितदादा ED कार्यालयात, तर शरद पवार मैदानात

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना बारामती अ‍ॅग्रो कंपनीप्रकरणात ईडीने बुधवारी (ता. 24 जानेवारी) हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ते बुधवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, हे राहित यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार चौकशी होत असताना पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयात बसून राहणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाजवळच ईडीचे कार्यालय आहे. रोहित पवारांची बुधवारी ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. त्यावेळी शरद पवार, (Rohit Pawar) रोहित पवारांसाठी दिवसभर आपल्या पक्ष कार्यालयात बसून राहणार आहेत.चौकशी संपून रोहित पवार बाहेर येईपर्यंत पवार तेथेच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या रोहित यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ईडीविरोधात निषेध आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.

ईडीच्या या समन्समुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे. ईडीची नोटीस मिळाल्यानंतर रोहित यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्याप्रमाणेच ईडीला उलट आव्हान दिले होते. चौकशीसाठी 24 ला कशासाठी, 22 किंवा 23 तारखेलाच येतो, असे ते म्हणाले होते. त्यामुळे आता होणाऱ्या चौकशीत काय होणार, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी त्यांनी स्वत:हून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. ईडीने दाखल केलेला गुन्हा नेमका काय ? हे समजून घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली होती. आताही रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने निषेध व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT