Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Ajit Pawar : शरद पवारांचा एक घाव दोन तुकडे, थेट शिवसेना अन् भाजपच्या हिंदुत्वातला फरकच सांगितला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवारांसह आठ जणांनी भाजपा शिवसेना युतीत सहभागी होतानाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीत उभू फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यानंतर दोन्ही गटात गावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोपांनी जोरदार घमासान सुरु आहे. याचवेळी अजित पवारांनी आम्ही जातीयवादी म्हणणाऱ्या शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही असा सवाल उपस्थित होता. आता शरद पवारांनी अजित पवार या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)ची बैठक वायबी सेंटरमध्ये बुधवारी (दि.५) आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी नागालँडमध्ये भाजप आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. पवार म्हणाले,नागालॅँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आमदार निवडून आले. आणि नागालॅंड काय किंवा मणिपूर ही यांच्या शेजारी प्रामुख्यानं चीन आणि पाकिस्तान हे देश आहेत. तिथे छोटी छोटी राज्ये आहेत. तिथे उद्रेक झाला त्याचा गैरफायदा शेजारच्या देशांनी घेतला. म्हणून असे काही निर्णय घेतले गेले आणि तिथे बाहेरुन पाठिंबा देण्यात आला. आपण सरकारमध्ये गेलो नाही. भाजपसोबत जे जे गेले ते संपले असा घणाघातही शरद पवारांनी केला.

शिवसेना आणि भाजपमध्ये फरक...

शिवसेना आणि भाजप(BJP)मध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात इंदिरा गांधीबाबत एक वेगळे वातावरण होतं. त्यावेळी देशाच्या ऐक्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला. इंदिरा गांधींना या संकटात मदत केली पाहिजे. त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि सहकार्य इथपर्यंत केलं की विधानसभा निवडणूक राज्यात आली त्यावेळी एकही उमेदवार शिवसेनेनं उभा केला नाही. आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि देशात ऐक्याला धोका निर्माण होऊ दिला नाही असा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतला.

''भाजपचं हिंदुत्व हे विभाजनवादी आणि...''

शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते त्यांनी लपवून ठेवलेलं नाही. आणि त्यांचं हिंदुत्व हे सर्व जातीतील घटकांना सोबत घेऊन जाणारं आहे. तर भाजपचं हिंदुत्व हे विभाजनवादी आणि विखारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसांमध्ये अंतर वाढविणारे, व्देष वाढवणारं हे हिंदुत्व आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी दंगली झाल्या. या दंगलीत कोण होतं हे देशाला माहितीय. दंगली निर्माण करायच्या आणि त्यांचा राजकीय फायदा घेता येईल का अशी भूमिका भाजपकडून घेतली जाते.

'' पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते...''

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवारां(Sharad Pawar)नी दिला. जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही असाही टोला त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगावला.

'' त्यांचं नाणं चालणार नाही...''

आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवारांनी दिला. जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही असाही टोला त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगावला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT