Sharad Pawar's autobiography should be declared as the agricultural policy of the country: Sadabhau Khot
Sharad Pawar's autobiography should be declared as the agricultural policy of the country: Sadabhau Khot 
मुंबई

शरद पवारांचे 'आत्मचरित्र'च देशाची कृषीनिती म्हणून जाहीर करा : सदाभाऊ खोत 

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुस्तक देशाची कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी, असा खोचक सल्ला रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात दाखल खटल्यांचा आज कऱ्हाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात निकाल लागला. त्या पार्श्वभूमीवर श्री. खोत येथे आले होते. निकालानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

श्री. खोत यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र डागले. श्री. खोत म्हणाले, ज्येष्ठ नेते पवार दिल्लीला गेलेले आहेत. त्यांचाही शेतीतला मोठा अभ्यास आहे. ते शेतीतले जाणकार आहेत. पवार साहेब जाताना त्यांचे आत्मचरित्र घेऊन गेले असतीलच. मला वाटतंय की, केंद्राला तेच पुस्तक त्यांनी सादर करावे आणि तेच आत्मचरित्र कृषीनिती म्हणून लागू करावे. तीच देशाची कृषीनिती असावी. 

शरद पवार यांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून लागू केली तरी देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असा विश्वास आहे. श्री. खोत यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र डागले. ते म्हणाले, आमच्यावर खटले दाखल झाले तेव्हा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मातीतील पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.

त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले होईल अशा अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी सगळ्या अपेक्षा धुळीस मिळवल्या. एखादा सभ्य व्यक्ती राजकारणाच्या पटलावर सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आहेत. 

शेतकऱ्यांवर ते सत्तेत असताना दाखल झालेले गुन्हे म्हणजे सत्तेचा वापरच आहे. इंदापूरात आंदोलन करत असताना आम्ही काही कारणांनी तरूंगात गेलो. त्यावेळी आम्ही तेथे शेतकऱ्याकडून बाहेर काही कृती सुरु होत्या. सदर कृत्यांत आम्ही तरूगांत असूनही सहभाग होता, असे समजून त्यावेळच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले, हेही चुकीचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT