Sharad Pawar and Chhagan bhujbal  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Bhujbal: तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते; शरद पवारांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Mumbai NCP News: बीडमधील सभेत बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांनी काही जुन्या गोष्टींचे संदर्भ देत शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. तेलगी घोटाळा प्रकरणात शरद पवार यांनी माझा राजीनामा का घेतला ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता भुजबळांच्या याच प्रश्नाला शरद पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

"तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते", असे मोठे विधान शरद पवारांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षांची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पवार बोलत होते.

याचवेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाधिकाऱ्यांना कानमंत्र देत "कोणताही संभ्रम ठेवू नका. लढायला लागा", असे थेट आदेशच त्यांनी दिले. "अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे. मात्र, त्यांना कोण समजवणार ?, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका", असा सल्ला देखील शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या गटाची बीडमध्ये सभा पार पडली. याच सभेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत तेलगी घोटाळा प्रकरणादरम्यान आपला राजीनामा का घेतला ?, साहेब आमची काय चूक होती ते सांगा, असे सवाल उपस्थित केले होते.

आता यावर शरद पवारांनी पहिल्यांदाच भाष्य करत "तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते", असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता यावर पुन्हा भुजबळ काही बोलतात का, ते पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT