Sharad Pawar-Dharmendra Pradhan Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar On Pradhan : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया : ‘लोकशाहीने कात टाकली...युवा पिढीला श्रेय’

Cockroach Janata Party protest : नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवार यांनी लोकशाही आणि युवा शक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

Sudesh Mitkar

Mumbai, 25 July : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी उभा केलेल्या आंदोलनाला आज (ता. २५ जुलै) अखेर मोठे यश आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या २०१४ पासूनच्या सत्ताकाळात प्रथमच एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना ‘देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं,’ असे म्हटलं आहे.

शरद पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्रीय मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.

आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

युवकांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि खासदारांनी दिलेल्या पाठबळाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या प्रतिक्रियेचा शेवटी शरद पवार यांनी देशातील तरुणांचे विशेष कौतुक केले. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT