Supriya Sule on Ajit Pawar: Sarkarnama
मुंबई

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांची साथ...? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

Maharashtra Political Crisis: रविवारी देवगिरी बंगल्यावर काय झालं यावरही सुप्रिया सुळेंनी सविस्तर भाष्य केलं आहे.

अनुराधा धावडे

Supriya Sule on Ajit Pawar : रविवारी मी बराच वेळ अजित पवार यांच्या निवासस्थानी होते, आमच्यात सविस्तर चर्चाही झाली. पण त्यांच्या निर्णयाबद्दल मला काहीही माहित नव्हतं, असा दावा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी रविवारचा घटनाक्रमावर सविस्तर भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.पण हे सर्व दावे सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावले आहेत.

रविवारी मी अजितदादांच्या निवासस्थानी गेले होते. पण दादांच्या मनात काय चाललंय याची मला काहीही माहिती नव्हतं.काही वेळानं एक-एक करून आमदार देवगिरी बंगल्यावर येऊ लागले आणि मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनाकडे रवाना झाले, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. (Supriya Sule on Ajit Pawar)

सुप्रिया सुळे म्हणाल्या,जेव्हा मी देवगिरी निवासस्थानी गेले तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा ते आले असावेत, असं मला वाटलं. कारण काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती.

अजित पवारांच्या या निर्णयामागे शरद पवार (Sharad Pawar) आहेत, यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,शरद पवारांनाही अजित पवारांच्या या निर्णयाची काहीच कल्पना नव्हती. जर पवार साहेबांना याची पुसटशीही कल्पना असती तर साहेबांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती.बंडखोरी केलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई केली नसती.

शरद पवार अंधारात न ठेवता अजित पवार हा निर्णय अधिक सन्मानपूर्वक घेऊ शकले असते. पण त्यांच्या या निर्णयामुळे मी निराश झाले आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीच शरद पवारांना अंधारात ठेवलं नाही. प्रत्येकाने शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे कारणही सांगितले.पण अजित पवारांच्या या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही, पण मला धक्का बसला आहे, अशी खंतही सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केली.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT