Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा; म्हणाले, "काही लोकांनी मला दिल्लीच्या कोर्टात नेलं, पण..."

NCP Sharad Pawar Group News : " सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याची वेळ आली आहे."

Deepak Kulkarni

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची जाहीर सभा मुंबईत पार पडली. या सभेत पवार गटाच्या नेत्यांनी सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटासह भाजपवरही सडकून टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीदेखील या सभेत पक्षाच्या न्यायालयीन लढाईवर भाष्य करतानाच अजित पवार गटाला धारेवर धरले.

पवारांनी या सभेत काही लोकांनी मला दिल्लीच्या कोर्टात नेलं, पण आपली बाजू सत्याची आहे. त्यामुळे निकाल हा तुमच्या बाजूने लागेल आणि चित्र बदलेल. खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती असल्याचे म्हणत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दुसरे कोणाला मिळणार नसल्याचा दावाही केला आहे.

राष्ट्रवादीच्या(NCP) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं. या सभेत पवारांनी अजित पवार गटासह भाजपवरही टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, मुंबईतील आजची पक्षाची बैठक आत्मविश्वास वाढवणारी आहे ही आनंदाची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पण आमच्या काही मित्रांनी ईडीच्या भीतीने वेगळी भूमिका घेतली. वेगळा मार्ग निवडलेल्यांनी त्यांचा अध्यक्षही निवडला, पण त्यांच्यातला मुंबईतला अध्यक्ष तुरुंगात गेलेला आहे असल्याची टीकाही त्यांनी केली.

पवार म्हणाले, सध्या सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं. आपली बाजू सत्याची आहे. त्यामुळे निकाल हा तुमच्या बाजूने लागेल आणि चित्र बदलेल. खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेला माहिती आहे.

केरळ, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणामध्ये भाजप आहे का, असा सवाल उपस्थित करत पवार यांनी देशात दिवसेंदिवस भाजप कमी होत चालली असल्याचा दावा केला. या वेळी त्यांनी महाराष्ट्रात आमदार फोडून सरकार आणण्यात आलं. याचं कारण म्हणजे सत्तेचा गैरवापर सांगत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

....असे घातक निर्णय घेणारे सरकार नको!

शरद पवार (Sharad Pawar)म्हणाले, या सरकारने खासगीकरण सुरू केले आहे. यापूर्वी कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती कधी झाली नाही. पोलिसांनी कंत्राटी पद्धतीने भरती करणं चुकीचं आहे, पण याच सरकारकडून कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती ऐकली, असं म्हणत त्यांनी कंत्राटी भरतीवरून सरकारला टोला लगावला. तसेच या वेळी त्यांनी असे घातक निर्णय घेणारे सरकार नको असेही सांगितले.

पवार म्हणाले, राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील आता ऐरणीवर आला आहे. 19 हजार 553 मुली बेपत्ता झाल्याची माहिती माजी गृहमंत्र्यांनी बैठकीत दिली. एवढ्या महिला आणि मुली गायब आहेत, त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल. सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाही, त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आता आपल्याला घेणं गरजेचं असल्याचेही पवार यांनी सांगितले.

"...पण आमचा अध्यक्ष तुरुंगात गेलेला नाही!"

अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांच्याऐवजी समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटाकडूनदेखील अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार गटाने आता राखी जाधव यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

या वेळी समीर भुजबळ यांच्या नियुक्तीवरून पवारांनी अजित पवार गटाला टोला लगावला. पवार म्हणाले, त्यांचा मुंबईचा अध्यक्ष तुरुंगात गेलेला आहे, पण आमचा अध्यक्ष तुरुंगात गेलेला नाही. भाजपसोबत गेलेल्यांना जनतेचा पाठिंबा नसल्याचेही पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT