Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
मुंबई

गद्दारांनी कितीही गैरसमज पसरविले तरी... : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला

सरकारनामा ब्यूरो

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदासंघातील शिवसेना (Shivsena) आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार हल्लाबोल केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यास आम्ही गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत करू, असे महेश शिंदे म्हणाले होते. यावर शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शशिकांत शिंदे यांनी ट्वीट करत महेश शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ''आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही!, आम्ही पवारनिष्ठ! आमची निष्ठा नेत्यांच्या विश्वासावर आणि प्रेमावर टिकून आहे. ज्यांची लोकप्रियता ढासळू लागलीय आणि ज्यांना गद्दार म्हणून हिणवले जात आहे, अशांनी माझ्याबद्दल कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना त्यात यश येणार नाही. मी आदरणीय पवार साहेबांमुळेच घडलो आहे आणि कायम पवार साहेबांसोबतच राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पक्ष प्रवेशासाठी काही लोकांनी प्रयत्न केला असताना देखील मी कायम शरद पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिलो आहे, आणि हे सर्वांना ठाऊक आहे. अशा शब्दांत शशिकांत शिंदे यांनी फटकारले आहे.

महेश शिंदे काय म्हणाले होते?

राष्ट्रवादीला कोणतीही विचारधारा नाही. फक्त भ्रष्टाचार करणे एवढेच त्यांचे काम आहे. लोकांना बांधून ठेवायला एक विचारसरणी लागते, असा निशाणा महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीवर साधला होता. ती नसल्यामुळे राष्ट्रवादीला पक्षातले सहकारी आणि पक्ष टिकवून ठेवणे अवघड झाले आहे. काँग्रेस आमचा विरोधक असला तरी त्या पक्षाकडे स्वत:ची अशी एक विचारधारा असल्याचेही शिंदे म्हणाले होते.

भाजप आणि शिवसेनेचीही विचारधारा आहे. तसा कोणताच विचार राष्ट्रवादीकडे नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा राष्ट्रवादीला विसर पडलेला दिसतो. शशिकांत शिंदे भाजप प्रवेशाच्या मार्गावर असल्याच्या चर्चांबद्दल महेश शिंदे यांनी भाष्य केले होते. 'शशिकांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे ते म्हणाले होते. मात्र, ते आतापर्यंत चुकीच्या नेतृत्वात काम करत होते. त्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील लोकांना लुटले, हे सिद्ध होईल,' अशी टीका महेश शिंदे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT