Sheetal Devrukhkar News : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेटच्या सदस्या शीतल देवरुखकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिला. शीतल देवरुखकर या आदित्य ठाकरेंच्या विश्वासू मानल्या जात होत्या. युवा सेनेत त्या सक्रीय होत्या.
देवरुखकर यांना मुंबई महापालिकेमतील प्रभाक क्रमांक 51 मधून उमेदवारी हवी होती. मात्र, पक्षाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडली. त्यामुळे त्या पक्षावर नाराज होत्या. मात्र, आज त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत ठाकरेंची साथ सोडली.
त्यांनी पक्षावर गंभीर आरोप करताना कार्यकर्त्यांना पक्षात काही स्थान नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, वाॅर्ड क्रमांक 51 मधून आपण निवडणूक लढण्यास इच्छुक होतो. मात्र, आपले फोन देखील उचलले गेले नाहीत, मेसेज देखील उत्तर देण्यात आले नाही.
आमदार चित्रा वाघ यांनी शीतल देवरुखकर यांचे पक्षात स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतमध्ये देवरुखकर यांनी भाजपात प्रवेश केला. चित्रा वाघ म्हणाल्या की, विचारांची स्पष्टता, विकासाची दिशा आणि मजबूत नेतृत्वावर विश्वास ठेवून शीतल ताईंचा भाजप परिवारात सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.भाजप महिला शक्तीसह अधिक बळकट होतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.