Sheetal Mhatre  Sarkarnama
मुंबई

Sheetal Mhatre News : उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो ट्वीट करत शीतल म्हात्रेंचा राऊतांवर निशाणा

Eknath Shinde News : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे ते दिल्लीला जात असतात. मात्र, तुम्ही का दिल्लीत जाता? तुम्ही दिल्लीत मुजरा करायला का जाता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केला होता. त्यावरुन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राऊतांवर टीका केली आहे.

राऊत यांच्या टिकेला शीतल म्हात्रे यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. म्हात्रे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''सिल्व्हर ओकची चाकरी करणा-या पायपुसण्याने खुर्चीकरिता सोनियाच्या दारी मुजरा करणाऱ्या पहिल्या ठाकरे पिता-पुत्रासंदर्भात आधी स्पष्टीकरण द्यावे आणि मग दुसर्‍यांवर टिका करावी... राजकारणासाठी बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि सामनातून त्यांचे फोटो वगळायचे हीच थुकरट प्रवक्त्यांची निती! अशा शब्दांत म्हात्रे यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

त्याच बरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. तो फोटो ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांना डिवचले आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली होती. शिंदे यांचे हायकमांड पूर्वी महाराष्ट्रात होते. आता ते दिल्लीत आहे. त्यामुळेच ते वारंवार दिल्लीला जातात. दिल्लीच्या वाऱ्या त्यांच्या वाढल्या आहे. शिंदे आपली शिवसेना असली समजतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कधी मंत्रिमंडळ विस्ताराची यादी घेऊन दिल्लीत गेले नव्हते, अशी टीका राऊत यांनी केली होती.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT