ajit pawar.jpg sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : शिखर बँकप्रकरणी अजितदादांच्या अडचणी वाढणार? न्यायालयात काय घडलं?

shikhar bank scam case : 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात गुरूवारी न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यापुढे सुनावणी झाली.

Akshay Sabale

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. या क्लोजर रिपोर्ट विरोधात निषेध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर 31 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात गुरूवारी न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यापुढे सुनावणी झाली. या प्रकरणात आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार आहेत, अशी माहिती याचिककर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं सुरूवातीला सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना क्लीन चिट क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. नंतर मार्च 2024 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

पण, आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला सक्तवसुली संचालनालयानं ( ईडी ) आक्षेप घेतला. नंतर सात सहकारी साखर कारखान्यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या सुटकेला विरोध करत निषेध याचिका दाखल केल्या आहेत.

याप्रकरणी गुरूवारी न्यायाधीश ए. यू. कदम यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी माणिकराव जाधव यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि वकील माधवी अय्यापन यांनी न्यायालयात एक अर्ज सादर केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं दोनदा दाखल केलेले क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यास मुंबई विशेष सत्र न्यायालयानं तयारी दर्शवली.

सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांमार्फत आणखीन 50 निषेध याचिका दाखल केल्या जाणार आहे, अशी माहिती वकील सतीश तळेकर यांनी न्यायालयात दिली. सर्व निषेध याचिका आणि दोन्ही क्लोजर रिपोर्टवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य करीत न्यायालयानं 31 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT