Rahul Shewale on Loksabha seats : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आगामी लोकसभा निवडणुकीत २२ जागा लढवणार असल्याची प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल रात्री उशीरापर्यंत शिवसेना खासदारांची (Shivsena MPs) बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात (Lokasabha Election) या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ( Shinde-Fadnavis' new formula for Lok Sabha? Rahul Shewale's indicative statement regarding 22 seats)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बैठक झाली.या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी १३ खासदारांच्या मतदार संघाचा आणि त्यांच्या कामाचा आढाव घेतला. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप आणि आणि शिंदे गट यांच्यात कशा प्रकारे जागावाटप होणार? याविषयी राहुल शेवाळे यांनी भाष्य केलं आहे. (Loksabha elections)
भाजपा-शिंदे गट जागावाटपाचा फॉर्म्युला?
भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच राहुल शेवाळेंनी दिलेली माहिती हे जागावाटप नेमकं कसं असेल,याबाबत सूचित करणारी असल्याचं बोलल जात आहे. “शिवसेनेने गेल्या वेळी ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली. त्या सर्व २२ जागांसाठी तयारी करण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली.त्या दृष्टीने १३ विद्यमान खासदारासह इतर जागांचाही आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीची तयारी केली जाईल.”, असं ते म्हणाले.
राहुल शेवाळे म्हणाले की, “ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व खासदारांची बैठक घेतली. १३ खासदारांच्या लोकसभेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच, लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. निवडणुकीपर्यंत शिंदे गटाच्या विद्यमान १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजप-शिवसेना आणि आरपीआय'चे संयुक्त मेळावे होतील. या सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासकामेही हाती घेतली जातील”, असंही त्यांनी नमूद केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.