Uddhav Thackeray Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

शिवसेनेच्या 'दसरा मेळावा' याचिकेत शिंदे गटाचा 'हस्तक्षेप' अर्ज : उद्या होणार सुनावणी!

Dasara Melava : शिवसेनेचा 'मुख्य नेता' म्हणून एकनाथ शिंदे यांचा अर्जात उल्लेख

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद घडून येत आहे. मात्र दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या माध्यमातून केलेले दोन्ही अर्ज महापालिकेने नाकारले आहेत. यामुळे आता हा वाद आता शिवसेनेकडून उच्च न्यायालयात गेले आहे. यासंदर्भात न्यायालयात आता उद्या (२३ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

महापालिकेने अर्ज नाकारल्यानंतर आता दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज दाखल झाला आहे. "याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापासून काही महत्त्वाच्या बाबी जाणीवपूर्वक दडवून ठेवल्या आहेत. खरी शिवसेना कोणती याचा वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे, ही बाब आता शिंदे गटाकडून हस्तक्षेप अर्जाद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले गेले आहे.

"शिवसेना पक्ष कोणाचा, खरी शिवसेना कोण, हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना उद्धव ठाकरे यांचा गट आपणच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा करत, मागच्या दाराने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हा न्यायालयाचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे", असा शिंदे गटाने आरोप केला आहे.

"मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व शिवसेनेचा मुख्य नेता एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी म्हणून अर्ज करत आहे, असे नमूद करत सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहे. यासंदर्भात न्यायालयात आता उद्या (२३ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT