Ramdas Kadam Sarkarnama
मुंबई

Ramdas Kadam News : शिंदे गटाची धडाडती तोफ रामदास कदमांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

Shivsena news : ...कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून सातत्यानं उध्दव ठाकरे गटावर टीकेची तोफ डागणारे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून रामदास कदम यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र, आता शिंदेंची हीच धडाडती तोफ अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कदम यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या दोन्ही मुलांच्या मेसर्स योगीसिद्धी डेव्हलपर्स या कंपनीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आधीच ५० खोके आणि भ्रष्टाचाराच्या आरोप करत शिंदे गटाला डिवचणाऱ्या ठाकरे गटाला पुन्हा एकदा टीकेची संधी मिळाली आहे.

एकीकडे तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप होत असतानाच आता सत्ताधारी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याप्रकऱणी सोमवारी या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र, याचिकाकर्त्याला सुनावणी पूर्वी एक लाख रुपये जमा करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी याचिकाकर्त्याला 3 आठवड्याची मुद्दत कोर्टाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 जून रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी युक्तिवाद केला आहे.

काय आहे प्रकरण ?

रामदास कदम यांच्या योगेश कदम आणि सिद्धेश कदम या दोन्ही मुले योगीसिद्धी डेव्हलपर्समध्ये भागीदार आहेत. या कंपनीनं कांदिवली स्थित सिटीएस 147 वर एसआरए योजने अंतर्गत सुमुख हिल्स नावाच्या इमारतीचा पुर्नविकास केला आहे. मात्र, या इमारतीमध्ये कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयात(high court) दाखल करण्यात आलेल्या याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT