Kirit Somaiya
Kirit Somaiya  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : किरीट सोमय्यांवर संतप्त शिवसैनिकांचा पुन्हा हल्ला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच काल भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीला शिवसैनिकांनी लक्ष्य केल्यानंतर आज माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यात त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे.

किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मोठा दगड फेकला. यात त्यांच्या गाडीची काच फुटून काचांचे तुकडे त्यांच्या हनुवटीवर लागले. पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांवरती दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT