Uddhav Thackeray, Dada Bhuse, Hemant Godse sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंनी चंगच बांधला; गोडसे, भुसे, कांदेंच्या मतदारसंघातील रणनिती ठरली

शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवा, त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी एकजुट करावी, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

सरकारनामा ब्यूरो

Nashik Political News : शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवा, त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी एकजुट करावी. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिले. त्याच बरोबर मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे व आमदार सुहास कांदे यांच्या विधानसभा मतदारसंघात तोडीस-तोड उमेदवार देण्यासाठी चाचपणी करण्याच्याही सुचना त्यांनी दिल्या आहेत.

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापने केले आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे हा संघर्ष आता टोकाला गेला आहे. ही बाब लक्षात घेता सव्वा वर्षावर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंनी तयारी सुरू केली आहे.

लोकसभे बरोबरच विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यात लक्षात घेऊने ठाकरे यांनी नाशिक व दिंडोरी या लोकसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीत त्यांनी लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या 15 जागासंदर्भात आढावा घेतला. प्रामुख्याने उमेदवार कोण याबाबतची त्यांनी चाचपणी केली.

कोणत्याही परिस्थीतीत शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांना धडा शिकवा असाही संदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे. या वेळी संपर्कप्रमख भाऊसाहेब चौधकी, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, वसंत गिते आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, महापालिका निवडणुक जानेवारी किंवा फेब्रुवारीत होउ शकतात.

संघटनेला बळकटी देण्यासाठी रिक्त असलेल्या गटप्रमुख व बुथप्रमुखांच्या जागा भरण्याच्या सुचनाही ठाकरे यांनी केल्या आहेत. तसेच सदस्य नोंदणी वाढवण्याच्या सुचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. तसेच 1 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर यादरम्यान मतदार नोंदणीसाठी मोहीम आहे. या मोहीमेत जास्तीजास्त मतदार नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असेही आदेशही ठाकरे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT