मुंबई

'२०२४ नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी' :संजय राऊतांचा एल्गार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनाचा (Shivsena) दसरा मेळावा (Dasara Melava) आज सांयकाळी षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच, २०२४ च्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील आणि राज्यातील अनेक घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं आहे. देशाने अजून लाज सोडली नाही हे २०२४ च्या निवडणूकीत स्पष्ट दिसून येईल. असे म्हणत संजय राऊत यांनी २०२४ च्या निवडणूकांनंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणच्या (National Politics) केंद्रस्थानी दिसेल, असा एल्गार केला आहे.

आजच्या दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे. कोरोना पार्श्वभुमीवर यंदाही शिवतीर्थावर मेळावा होऊ शकत नाही, त्यामुळे षणमुखानंद हॉलमध्ये नियमांचं पालन करुन आजचा मेळावा होईल, शिवसेनेची दिशा दाखवणारं आजच भाषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यातून राज्याला, देशाला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल. शस्त्र कधी कुणासाठी काढायची असतात हे आज उद्धव ठाकरेंच्या भाषणातून कळेल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

विजया दशमीच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत जे म्हणाले, ते योग्यच आहे. पण जर नार्कोटिक्स, ड्रग्जचा पैसा देशविरोधी कारवाया करण्यासाठी वापरला जात असेल तर केंद्र सरकार काय करतंय? असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे. तसेच, नोटबंदीच्या निर्णयावेळी पंतप्रधान मोदींनीच ड्रग्जचा पैसा जो दहशतवादी, माफियांना मिळतो तो बंद होणार असल्याचं सांगितलं होतं. पण जर अजूनही तो पैसा दहशतवादी,ड्रग्ज माफियांना मिळत असेल तर सरसंघचालकांची चिंता योग्य आहे. आम्ही त्या चिंतेशी सहमत आहोत”. “देशात प्रखर हिंदुत्ववादी पंतप्रधान असतानाही असं होत असेल तर याची जबाबदारी कोणाची असेल, असा प्रश्न आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT