Sanjay raut- Narayan Rane  
मुंबई

नारायण राणेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे शिवसेना-भाजप वादाची ठिणगी

नारायण राणेंचा लोकसभेतील तो व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या लोकसभेतील एका व्हिडीओमुळे आता आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. नारायण राणेंना ट्रोल करत शिवसैनिकांकडून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत होत आहे. तर नारायण राणेंमुळे (Narayan Rane) लोकसभेत महाराष्ट्राची (Maharashtra) मान खाली गेली, अशा शब्दांत शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनीही राणेंवर टीका केली आहे.

राजधानी दिल्लीत संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी इंग्रजी भाषेतून, देशातील बंद पडलेल्या आणि डबघाईला आलेल्या उद्योगांसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना उद्योजकांपर्यंत कशा पोहोचवणार, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला मंत्री नारायण राणेंना उत्तर व्यवस्थित देता आलं नाही, असं म्हणत शिवसैनिकांनी राणेंचा हा व्हीडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. त्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यामुळे मंत्री राणेंना अनेक टीकांचा सामना करावा लागत आहेत.

तर दूसरीकडे लोकसभेच्या बाहेर १२ निलंबित खासदार आंदोलन करत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत भेटायला गेले होते. त्यादरम्यान संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासाठी खूर्ची देण्याचा वादावर बोलताना संजय राऊतांचा संयम सुटला आणि नवा वाद सुरु झाला. यानंतर ज्यातल्या काही नेत्यांची जीभ जास्तच चालायला लागली, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. पोलिसांचा गराडा बाजूला ठेवा, मग जीभ कशी वापरायची ते दाखवून देऊ, असा इशाराच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT