मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना'इम्पोर्टेड माल'म्हणणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांना आता 'उपरती'झाली आहे. शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. सावंत यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना 'माल' असं म्हटलं होते. त्यावर शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांचा समाचार घेतला घेत त्यांना सुनावले होते. शायना यांनी याबाबत सावंतांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. राज्य महिला आयोगाने त्यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी उद्धव ठाकरेंच्या खासदारांने एका महिला उमेदवारांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाने सगळीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला कोंडीत पकडले होते. सावतांच्या विधानाचा फटका निवडणुकीत बसू शकतो, म्हणून सावंतांनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे.अरविंद सावंत यांची दिलगिरी म्हणजे त्यांना उशीरा सूचलेले शहाणपण आहे, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.
खासदार अरविंद सावंत महिलांची माफी मागावी, अशी मागणी शायना एनसी यांनी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रार केली आहे. या प्रकरणावर अनेक नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या. मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सावंत यांची पाठराखण केली होती.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अरविंद सावंत यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी महिला नेत्या शायना एन सी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केलेले आहे.राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून मुंबई पोलिसांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे टि्वट चाकणकर यांनी केले होते.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार शायना एन सी यांना उद्देशून 'इम्पोर्टेड माल नहीं चलेगा, ओरिजनल चलेगा', असे म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.